STORYMIRROR

Sneha Bawankar

Inspirational Others

3  

Sneha Bawankar

Inspirational Others

ऋण माझ्या आई-बाबाचे..!

ऋण माझ्या आई-बाबाचे..!

1 min
190

घडतो एक प्रसंग जीवनात प्रत्येकाच्या 

जिथे श्वासही घ्यायला होतो नाहीसा

पण एक शिकवण देऊन जातो तो प्रत्येकाला

जिथे एकाचा हात सुटल्यास,

मिळतो दुसऱ्याचा हात आपल्याला.


आज बोलता-बोलता एक नवीन शिकवण मिळाली मला

जिथे स्वतःचेच वर्चस्व नाहीसे वाटले स्वतःला

खरं म्हणतात, की हा काळ खूप बदलला

जिथे काळोख अंधार होता तिथे विश्वासाचा प्रकाश पसरला.


आज दीर्घकाळ विचार आला माझ्या मनात

विचार आला होता की,' कुणी भविष्यासाठी वेळ देणार काय मला?'

पण म्हणताच त्याला, अश्रू दाटले रक्ताचे माझ्या डोळ्यात...

वाटल की जीव देऊन जावं नरक यात्रेला.


एवढे घडताच एक नवीन आशेची किरण भेटली मला

जिथे वाटले की दुसरा प्रयत्न असू द्यावा आपला 

कारण आता वयच काय माझे सांगायला...

की मी महत्त्व देणार आत्महत्येला.


आता मी मोकळे सोडले माझ्या विचाराला

जिथे विचारांनी शब्दांचा खेळ मांडला

विचार पाडला होता तेव्हा मी माय-बापाला

आता म्हणतात, 'आज काल खूप हसतांना दिसते आम्हाला.'


मी म्हटले, 'तुमची साथ मिळाली आहे मला.'

जिथे मनात तुम्ही विश्वासाचा दीप उजळवला

जिने कधी तरी महत्त्व दिले होते आत्महत्येला 

आज तिनेच विचारांचे महत्त्व कळवले प्रत्येकाला.


जीवनाचे सर्व सत्य मी सांगितले आहे आई-बाबाला

पण तरीही त्यांचा माझ्यावरील विश्वास आणखी वाढला

माझे नकारात्मक कृत्य विसरून आशीर्वादाची साथ मिळाली मला

ऋण माझ्या आई-बाबाचे की त्यांच्या पोटी मी जन्म घेतला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational