Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Inspirational

4.5  

Neha Ranalkar

Inspirational

आयुष्य

आयुष्य

1 min
313


आयुष्य हाच एक प्रवास

आदीकडून अनंताकडे‌|

अशाश्वत अशा जगाकडून 

नेतो शाश्वत जगताकडे||१|| 


सुख-दुःख, आशा-निराशा

यश-अपयश येती ठिकाणे‌|

मुक्काम येथे काही क्षणांचा

प्रवास करावा क्रमाक्रमाने||२||


नाती-गोती, मित्र-मंडळींना

जावे लागते भेटायला गावी|

नोकरी, धंदा वा जिविकेसाठी

पर्यटनस्थळेही वाटती पाहावी||३||


मिळवून देई कधी मनस्वी आनंद 

कधी मनस्ताप नि जास्त दगदग|

तरीही प्रवास हा लागतोच करावा 

जीवाची होण्या दूर ती तगमग||४||


काहींसाठी असे छंद ही भटकंती

देश विदेश पर्यटनाची नामी संधी| 

'माझे घर हेच विश्व' मानणाऱ्यांना

घालावी वाटते पर्यटनावरच बंदी||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational