प्रश्नभूपाळी
प्रश्नभूपाळी
उत्तराच्या शोधात
प्रश्नच आले पायदळी
उत्तर राहिले दूरच
शंकांची मांदियाळी.
शंकांना फुटले पाय
बनले असंख्य कोळी
विलोभनीय वाटावी
अशी विणली जाळी.
कर्मधर्म गेला विसरून
घर्माचा ओघळ भाळी
नवीन प्रश्न तयार झाले
सुरू झाली आळीपाळी.
उत्तरे बिचारी प्रतिक्षेत
ताटकळलीत ऐनवेळी
मावळला जुना दिवस
उद्या नवीनच भूपाळी.
