परकं असं वाटतं
परकं असं वाटतं


चाहूलही लागत नाही
मोसमाची..मनाकाशात
अन..मळभ दाटतं.
नेमकं काय पोरकं होतं
कळण्याआधी...सारंच
परकं असं वाटतं.
भाराच बांधलेला असतो
आठव मांडून वाटण्यास
सांगायचं राहून जातं.
तशीही निसरडीच वाट
आसवांची...रोखलेलं
गावही वाहून जातं.
आपलेपणाचं पक्क गणित
"मी" पणानं... जेव्हा चुकतं
परकं असं वाटतं.