"पिंजरा"
"पिंजरा"
उत्तम या शरीराचा
कर्मयोगे पिंजरा झाला
मनुष्याला सावरण्या
ईश्वर धाऊन आला
कर्माच्या पिंजऱ्यात
मनुष्य अडकला
काम क्रोध अग्नी
देहातून भडकला
अंधश्रद्धेच्या पिंजऱ्यात
माणूस झाला बेजार
ज्ञानाविण जाईल कसा
अंधश्रद्धेच्या पार
गुन्हेगारी केल्यानंतर येते
आपल्या हाती बेडी
अटक करण्यासाठी येई
पोलिसांची पिंजरा गाडी
व्यसनाधीनतेने झाला
देहाचा पुरा पिंजरा
आयुष्य वाचवण्यासाठी
कर देवाला मुजरा
