STORYMIRROR

Sandip Bagade

Inspirational

4  

Sandip Bagade

Inspirational

पैसा

पैसा

1 min
465

आयुष्यभर माणूस करी

पैसा पैसा पैसा 

पैसा म्हणजे नक्की काय 

हा आहे तरी कैसा?


सर्व व्यवहार मात्र 

पैसाच करतो 

पैशासाठी माणूस 

मर मर मरतो 


पैसा असेल त्याला 

मिळत असते किंमत 

पैशावाल्याला बोलायची 

नसते कोणात हिंमत 


पैशासाठी माणूस 

रात्रभर जागला

पैशासाठी माणूस

कसाही वागला 

 

पैशासाठी माणसे 

चोरीमारी करती 

असा पैसा आला की 

दानधर्म करती


पैसा आला की माणसे 

ऐशोआराम करती 

खोट्या पैशापायी 

मेहनत विसरती


मेहनतीने कमव 

तू घामाचा पैसा 

कोणाला लुबाडून

नको असा पैसा


ज्याच्याकडे पैसा 

तो होई मालामाल

ज्याच्याकडे नसे 

त्याचे होती हाल


कितीही कमवला पैसा 

तरी मोह सुटत नाही 

कमावलेला पैसा शेवटी 

आयुष्यभर टिकत नाही 


सर्वस्व नसतो पैसा 

हे आम्हा कळत नाही 

पैशापुढे नातीगोती 

विसरून जाई 


पैसा आहे साधन 

त्याचं वेळेनुसार मोल 

जिवलग नात्यापुढे 

पैसा ठरतो फोल


पैसा असता तू 

मौजमजा करशी 

शेवटी मात्र माणसा तू 

रीत्या हाती जाशी


नको खेळू खेळ 

तू कमवण्या पैसा 

माणसाला तारतो 

आणि मारतोही पैसा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational