STORYMIRROR

Sandip Bagade

Inspirational

4  

Sandip Bagade

Inspirational

कन्यादान

कन्यादान

1 min
543

आनंदलो होतो मी जन्म होता तुझा मुली 

तुझ्या पदस्पर्शाने माझी जीवनबाग फुलली 

शिकविता तुला बाळपोथी बाळभाषा वदनी 

श्रीगणेशा गिरवीत होतो हात तुझा धरुनी 


दुधा-तुपाने न्हाऊन मुली वाढविले मी तुला 

तुझ्याचसाठी झिजलो माझ्या गुलाबाच्या फुला 

हवे नको ते दिले तुला मी तुझ्या माझ्या प्रेमापोटी

तुझ्या सुखासाठी मी जपले नामस्मरण कोटी 


बालपणीचा खेळ संपला झालीस तू मोठी 

तुझ्या लग्नाचे विचार येता शब्द निघेना ओठी 

भातुकलीच्या खेळामधली होतीस तू गं परी 

माझ्या अंगणी वाढलीस अन् गेली परक्या घरी 


बाप तुझा मी दिला तुला गं कुशीत या आसरा 

वात्सल्याची ठेऊन आठवण गेलीस तू पाखरा 

पाठवणी करता तुला गं माझ्या डोळा आले पाणी 

समय सरता मला आठवल्या बालिश त्या आठवणी 


जन्मभरी जपलेले हे तुटले सगळे धागे 

गहिवरलेले डोळे बघती वळून का मागे 

ज्याची त्याला ठेव अर्पुनी सरली गोड कथा 

कन्यादाना तुझी उपजली हळवी एक व्यथा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational