"माझा संघर्ष"
"माझा संघर्ष"
जीवन हे जगताना
चेहऱ्यावर ठेवा हर्ष
सत्य मार्गाने जिंकण्या
करावा लागे संघर्ष
अस्तित्व टिकवण्यासाठी
जिवनात असते चढाओढ
संघर्षाशिवाय अपूर्ण असे
जिंकण्याची ओढ
पेच प्रसंग उभे राहता
करावा लागे सामना
संघर्ष फक्त माझाच
कोणी न करी मनोकामना
न खचता उभे राहून
मी चेहऱ्यावर ठेवतो हर्ष
जीवन आहे माझे
अन माझाच असे संघर्ष
घाबरू नको आव्हानांना
त्यांचं स्वागत कर सहर्ष
जन्मापासुन मृत्युपर्यंत
करावा लागेल संघर्ष
विजय होईल तुझाच
तु घेऊ नको माघार
जीवन आहे आपलं
संघर्षाच आगार
