बापमाणुस
बापमाणुस
नाथाभाऊ आहात तुम्ही बापमाणुस!
सदैव केली तुम्ही सामान्यांची विचारपुस!!
खान्देशातले भाऊ दिगग्ज नेते !
सत्तेत अथवा विरोधी पक्षात नेहमीच तुम्ही विजेते!!
नाथाभाऊ आहात तुम्ही बापमाणुस!
विरोधी पक्ष नेता म्हणून विरोधकांचा ,
तुम्ही नेहमी घेतला समाचार खरपुस!!
विकास हेच तुमचे ध्येय!
संघर्ष जणु तुमचा परिचय!!
नाथाभाऊ आहात तुम्ही बापमाणुस!
निश्चयाचा महामेरू!!
पाठीत जरी खुपसला खंजिर!
भाऊ बिरबला सम चतुर!!
राष्ट्रवादीत राजकीय यश मिळवतील!
असे भाऊंचे नेतृत्व खंबिर!!
चाळीस वर्षे भाजपाची केली सेवा!
घरोघरी कमळ फुलले तेव्हा!!
भाजपातील विरोधकांनी जरी आरोपमयी फेकला चिखल!
पण आता नाथाभाऊंच्या रूपात महाराष्ट्रात फक्त घड्याळ दिसेल!!
नाथाभाऊ आहात तुम्ही बापमाणुस!
भाऊंचा ध्यास, खान्देशाचा विकास!!
