STORYMIRROR

Swarup Sawant

Tragedy Inspirational

4  

Swarup Sawant

Tragedy Inspirational

विषय -हो व्यसनमुक्त

विषय -हो व्यसनमुक्त

1 min
216


अखेरच्या श्वासापर्यंत

तडफडे आत्मा जोवर

हो तू आता व्यसनमुक्त

वेळ निघून जाईल जोवर॥१॥


सिगारेट दारू जीवनात

उधळेल आरोग्य तोवर

गांजा ही देई सोबत

बरबादी असेल तोवर॥२॥ 


शाई भिनू दे रक्तात

घे शपथ कागदावर

राख आता तनमनात

जीव नको टांगणीवर॥३॥

  

वाईट सवयी बासनात

ठेव तू आता वेशीवर

रहा सदैव तू सुखात

बरसात होई जोवर॥४॥


निरोगी राही आयुष्यात

वसा घेशील तू जोवर

सांग साऱ्या जनमनात

संदेश देशील तोवर ॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy