सोड मुखवटा
सोड मुखवटा


गांधीजींच्या त्यागाला
मुर्खांनो केलात नकटा
सत्यमं शिवंम सुंदरतेचा
आता सोड मुखवटा
सत्य अहिंसा मार्गाला
दिली घरानेशाहीची जात
म्हणे सत्याग्रही आम्ही
स्वातंत्र प्रेमी नात
देशाचे श्रमीक असता
देशाची प्रगती गेली कुठं
पोटासाठी देश जळता
मुखी पंच पखवनाचा ताट
गावात देश सांगणाऱ्यांनो
गाव क़धी समजलात का
सत्तेत राहून देशहीत हे
मनात आणून पाहीलात का
देशसेवा करता करता
सात पिढीची बांधली गाठ
सत्ता विलासात हराम्यांनो
पुर्ण देशाची लावली वाट
सत्ता लोभी मुखवटा धारी
समाजाची किड आहात
जनता जनारदन जागेपर्येत
तुम्ही भूतलाचे स्वामी आहात