आईच्या प्रेमासाठी
आईच्या प्रेमासाठी
अंधाराच्या गर्भामध्ये,उजाळाचा शोध
संत सांगतात,चढ उतारात ज्ञानाचा बोध
मार्ग जेव्हा चाळला,फळे होती काट्यात
नशीबाला चाळतांना, कर्म दिसली वाट्यात
होऊ सके ना काही, मार्ग धरला गुरुचा
गुरु म्हणे बली पायजे,पाप आहे पुर्विचा
शोधा शोधात दिस गेले,दिवस आले मरणाचे
नाही जगला कामाचा,द्या घाव सरणाचे
मरणानंतर चक्र सुटले,असे मला वाटले
माझ्या वाट्यातील कर्मा मागे आप्तस्वकीय धावले
नाव घेई नाव ठेई, नावावरुन प्रसाद खाई
जगून मरणा गती गेलो परंतु पुन्ह नाही भेटली आई
अंधाराच्या गर्भा मध्ये प्रेम मला गवसले
ममता हेच अमृत, हे सत्य पुन्हा पुन्हा भासले
मरणानंतर प्रकाशात पण सत्य कुणास ना उमजले
प्रकाशाच्या बोधा नंतर पुनर्जन्मास मन धजावले