STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Comedy

3  

Sheshrao Yelekar

Comedy

झगडा

झगडा

1 min
1.2K

सकारी सकारी कायले

काव काव बया तू करते

तुयी बकरी रोज माया

वाळीत येऊन चरते


नोको सांगू पोरगा माया

तुमाले काट्यावानी चूबते

तू, तुयी खानदान तसी

तुया घरात पाणी मुरते


माल् सिखवते का तू

बिन बेगडाचा बैईल

बायको नाही हुंग

तुया आंगाले कारा मईल


तुया घरा मंदी

अवदसा भरली हाय

तुया मुळे शनी यते

जेवा गावात पळते पाय


तुवा मसण्या तोंड

नोको दाखवू मालं

सात जन्माची कट्टी

तुया नावाच ठोकतो तालं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy