STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Classics Inspirational

4  

Sheshrao Yelekar

Classics Inspirational

सडा

सडा

1 min
1

सकाळी उठून मी सडा टाकलें
 देव प्रसन्न निसर्गात मला दिसले

 सडा टाकून दारी रांगोळी टाकली
 चिऊ जवळ येवून बोलु लागली
 अंगणी सडा रांगोळीने मन सुखावले
 देव प्रसन्न निसर्गात मला दिसले

 सूर्यदेवाला अर्ध्य देऊन नमस्कार
 स्वर्ण किरणांणी तो केला स्विकार
 अंगणी तुळस वृंदावन बाई हसले
 देव प्रसन्न निसर्गात मला दिसले

 उठले सासू सासरे माझे झोपून
 मी त्यांना केला नमस्कार वाकून
 विठ्ठल रखुमाई त्यांच्यात दिसले
 देव प्रसन्न निसर्गात मला दिसले

 गाईचा हंबरडा ऐकून गोठ्यात गेली
 तिथे गाय वासराची ममता दिसली
 कृष्ण प्रेम बासरी धून तिथे ऐकले
देव प्रसन्न निसर्गात मला दिसले

 शेषराव येळेकर दि. ०१/०७/२०२६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics