STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Classics Fantasy Inspirational

4  

Sheshrao Yelekar

Classics Fantasy Inspirational

मन लागो रे लागो गुरु चरणी

मन लागो रे लागो गुरु चरणी

1 min
19

भजन मन लागो रे लागो

 मन लागो रे लागो मन लागो रे लागो गुरू चरणी
 तुका ,तुकड्या, गाडगे चरणी मन लागो रे गुरू भजनी

 गुरू माझे थोर, संत सद्गुरू विचारवंत
 ऐकून शुद्ध वाणी धावून येतो भगवंत
 किती वर्णू रे किर्ती, त्यांचे हृदय निर्मल पाणी
 मन लागो रे लागो गुरू चरणी ,तुका,तुकड्या गाडगे भजनी

 क्षिरसागर ज्ञानाचे, उभे नावे विद्यापीठ
 अंधकार मिटवून दिली प्रकाशाची वाट
 मन होते रे शुद्ध ऐकता गुरू भजन वाणी
 मन लागो रे लागो गुरू तुका तुकड्या गाडगे भजनी

 सुखाची पेटवून होळी समाजात रंगविली रांगोळी
 दिन दुबळ्याच्या सुखासाठी पसरवली झोळी
 मन झाले तल्लीन,शेष हाती शब्द गाते गीत रजनी मन लागो रे लागो तुका तुकड्या गाडगे भजनी

 ✍️शेषराव येळेकर दि.२०/०५/२६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics