STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Inspirational

4  

Sheshrao Yelekar

Inspirational

कशी भागवू ही भूक

कशी भागवू ही भूक

1 min
0

कशी भागवू ही भूक 

विठ्ठला पांडुरंगा ,असा कसा रे तू मूक |
तुझ्या दर्शनाची ,कशी भागवू ही भूक ||धृ||

माझ्या घरी म्हशी दहा चारा पाणी घालायला |
कसी येवू सोडून सर्व पंढरीची वाट चालायला ||१||

सासू माझी खट्याळ नंदन करते चुगली चाळ |
काम धंदा सोडून पांडुरंगा कसी धरु रे टाळ ||२||

नवरा माझा आहे गरीब पोटासाठी फिरे वणवण |
एक कळेवर एक सेलेला धरून मी फिरे रानोरान ||३||

एका जनार्दनी धंदा माझा आहे गरिबीचा ||
संसार करता बाई ध्यास लागला पंढरीचा||४||

शेषराव येळेकर 
दि. २९/०४/२६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational