वावरातली साळा
वावरातली साळा
हिरव्या गार वावरात
उभी जवारीची साळा
काळी भोर मातीत
लिवला जाते फळा
नांगराचा फन बनून पेन
लिवून सिकवते
पाऊस वारा जीव जंतू
फाळे गिरवते
वावराच्या साळेल्
पाऊस मारते बुट्टी
किड्या माखुळ्याले
नाही
बिलकुल सुट्टी
कास्तकार मासतर
लई परेसान
मस्तकावर हात ठेवून
पायते आसमान
वावराची साळेचा
अभ्यासक्रम भारी
भूक मातीच्या गनतात
बुडून दुनिया सारी
शेषराव येळेकर
दि.०७/१०/२५
