पोखरलेले मन
पोखरलेले मन
1 min
125
संशयाची सुई
जोडते दुखांना
मळाच्या ढिगावर
गाढतो सुखांना
काजव्या प्रकाशात
लंगडी काठी
आनंदी जीवनाची
लहानशी वाटी
अंगावर बसले
अंगाऱ्याचे वारे
डगमगणाऱ्या संसारावर
हसतात सारे
राखीच्या ढिगाऱ्यावर
कुत्र्यांची वरात
म्हणून संशयाची हवा
नको आपल्या घरात
