STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Romance Inspirational

3  

Sheshrao Yelekar

Romance Inspirational

हे बंध रेशमाचे

हे बंध रेशमाचे

1 min
653

लाल गर्द गुलाबी

बनून हृदयी छटा

तो सुगंध दरवळतो

वाऱ्याच्या घेऊन लाटा


परिपक्व फांदीवरती

उमगली कोवळी कली

आनंदाने हवेत डोलती

होऊन एक सावली


मंत्रमुग्ध भोवरा

मदपान करण्यात चूस्त 

प्रणयात पराग किरणे

फुलात खेळती मस्त


मातीला कवटाळून

बसली आहेत मुळं

दोघांच्या प्रेरणेने

उगवली रसाळ फळं


ती आणि मी

दोघात प्रेम गाठी

हे बंध रेशमाचे

ना सुटणार जन्मोजन्मी गाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance