STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Tragedy

3  

Sheshrao Yelekar

Tragedy

लतादीदी

लतादीदी

1 min
170

सरस्वती विलीन होऊन, हे नाते तुटले

ताल आणि राग सोडून,कसे सूर आटले


वसंताची पतझळ,दाट निराशा घेऊन

धुंद मुग्धस्वरांना,गेला गारवा हा गिळून 

सुकले सूर कंठात, पाहून मनी उर दाटले

ताल आणि राग.....


हवेतील राग हरपून,धरा सुन्न झाली

कोकीळा भारताची, सरस्वती चरणी गेली

विश्वास होईना मना,भावनेचे बांध फुटले

ताल आणि राग.....


सूरांची ही साधना, मुर्त रुपातूण अमुर्तात

परतून गेले तत्व,गानकोकिळा अनंतात

शेवटी या नियती समोर कुणी ना टिकले

ताल आणि राग....


भारत रत्न गानकोकिळा, राहशील मना

लता विश्व ना असताचे,तूझे सूर मनी जना

चराचरात सूर रुपात,जन हृदयी पाहीले

ताल आणि राग.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy