Untitled
Untitled
जय हो जय भारत माता
नशीब आमुचे थोर
तुझ्या कुशीत अमुची
रोज होते भोर
शहीद झालो आम्ही
स्वातंत्र्याचं पेरुन बीज
गर्व आम्हा आहे
या बलिदानाचे होईल चीज
वाहीला हे शरीर
हे बलिदान तुझ्या चरणी
तरी अपूरी ही सेवा
हे कर्म अजून पडलं उरणी
शतदा जन्म घेईन
देईन तुला बलिदान
तु सुफलाम सुजलाम
यातच अमुचे अभिमान
ध्वज तुझा लहरावा
गर्वाने वरती मान
शत्रूने घ्यावी धळकी
उंच असावा अभिमान
स्वतंत्र भारत देशात
सन्मानाने स्वास
शहीद झालो आम्ही
स्वातंत्र्य प्रभातीचे आम्हा विश्र्वास
