कोरडी माया
कोरडी माया
बास नऊ काड्या,विसावली काया !
आटला प्रेम झरा,उरली कोरडी माया !!धृ!!
होता जीव तेव्हा चाले उदो उदो!
आता देवाघरी तू सुखाने नांदो !!
तूझ्या आठवणीची उरली तेव्हढी छाया !!
आटला प्रेम झरा, उरली कोरडी माया !!१!!
हृदयात भरले काळे दुःखाचे बादल !
आठवणींच्या कोंदणी मन झाले अचल !!
पलटून यावं दिस, पडतो देवाच्या पाया !
आटला प्रेम झरा, उरली कोरडी माया !!२!!
डोळ्यासमोर उभे पळद्या आतील क्षण !
मनामध्ये तापतो निराधाराची ऊन !!
कणाकणात मन शोधे ममतेची काया !
आटला प्रेम झरा, उरली कोरडी माया !!३!!