लतादीदी चा परतीचा प्रवास
लतादीदी चा परतीचा प्रवास
साधला कर्माने परमार्थ ,चालली सोडून धन
आला काळाचा निरोप,आता विसाव्याचे क्षण
कण कण सोनं करत,झिजला शरीर परिस
पुन्हा नव रुप घेण्या,आत्मा चालला परतीस
सोडावे ना वाट तरी, मोठं करुनिया मन
आला काळाचा
पापण्यांच्या मागे,होते भावविश्व मोठं
किती करावी कसर,कच्च मातीचे माठं
सांभाळून सांभाळेना , झिजला हळूहळू तन
आला काळाचा
गळ्यामध्ये खेळे,नव रस चैतन्य सूर
आड वाट ही आली,नयनी अश्रुंचे पूर
भावनेच्या वनवा , पूर्ण पेटला वन
आला काळाचा
बीज सिंचून कर्माचे,सूर गाते शांतरस
दिवा रुप जगून,घेतला चिरशांती निवास
स्वर सुगंध बहरले,हवा करील गायन
आला काळाचा
