आई-बाप
आई-बाप
आमच्याच शहरात आम्ही अनोळखी झालो.
आज आई बाप म्हणून हरलो ।। 1 ||
ज्या हाताने तुला भरवत आलो
त्याच हाताने आज भीक मागू लागलो
आज आई बाप म्हणून हरलो ।। 2 ||
चार पैशाने भरली माझी ओंजळ,
पण माझ्या मायेची ओंजळ मात्र रिकामी झाली
आज आई बाप म्हणून हरलो ।। 2 ||
दमलो आज ह्या मतलबी लोकांमधी वास्तवास राहून
देवा तुला दंडवत घालतो वैकुंठी बोलावसं
आज आई बाप म्हणून हरलो ।। 2 ||