STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Drama Action Inspirational

4  

Sheshrao Yelekar

Drama Action Inspirational

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

1 min
7


मन दंगले भजनी रमले ऐकून खंजरी 
गुरूदेव तुकडोजी दर्शना आलो मी मोझरी 

खंजरीची मधुर वाणी छेडून जाते हृदयास
राष्ट्र शक्तीची ओजस्वी वाणी ओढून घेते मनास 
हवेच्या लहरी तून शब्द धुंद हृदय स्पंद तारी 
गुरूदेव तुकडोजी दर्शना आलो मी मोझरी 

राष्ट्र संताचे इवले रोप, झाले गडद वटवृक्ष 
शब्द वाणीतून अनुभवा येते आत्मा दक्ष 
आत्मशुद्धी गुरूदेव वाणी झाली कांदा भाकरी 
गुरूदेव तुकडोजी दर्शना आलो मी मोझरी 

गाव समृद्धीतून देश समृद्ध मंत्र एक ठाम 
सामुदायिक प्रार्थनेतून जागला घरोघरी राम 
गुरूदेव भजनी रमुन इंद्रीय भोगी नर नारी 
गुरूदेव तुकडोजी दर्शना आलो मी मोझरी 

शेषराव येळेकर 
दि.१९/०५/२६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama