STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Abstract Romance Fantasy

4  

Sheshrao Yelekar

Abstract Romance Fantasy

नयनी काजळ

नयनी काजळ

1 min
10

नयनी काजळ दि.24/05/26
 हळूहळू रजनीने
 घट्ट केली ओंजळ
 दिवाकराला विसरून
 नयनी लेवली काजळ

 ताप सारून दिनाचा
 नटून झाली शृंगारिक
 गळ्यात शोभे तिच्या
 निशा वेळी मानिक

 शहारून झूळझूळ
 मंत्र मुग्ध करते हवा
 दाहकता हरपून मिळे
 मनाला प्रेमाची दवा

 परतीची किलबिल
 हृदयात धकधकते
 रजनी रत स्वप्नात
 मन हृदयी साठवते

 मोहकता ही खुलून
 लुभावनी झाली रजनी
 नयन काजळ
 एका समयात सामावली

 रजनी - सायंकाळ दिवाकर - सूर्य निशा - रात्र

 ✍️ कवी शेषराव येळेकर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract