STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Abstract Fantasy Inspirational

4  

Sheshrao Yelekar

Abstract Fantasy Inspirational

कुठे हा लपला श्रीहरी

कुठे हा लपला श्रीहरी

1 min
10

कुठे हा लपला श्रीहरी 
दि. 24/05/2026

शोधत शोधत फिरलो धाम चारी 
कुठे हा लपला माझा श्रीहरी 

जाऊन पाहीला बद्रीनाथ धाम 
भक्तांच्या मुखी राम राम 
देव तेव्हा उभा पुंडलिका दारी 
कुठे हा लपला माझा श्रीहरी 

जगन्नाथ मंदीरी गेलो शोधाया 
रांगेत उभ्या मोह माया 
जनाई संग देव निघाला पायी वारी 
कुठे हा लपला माझा श्रीहरी 

जवळून पाहीला द्वारकाधीश मंदिर 
दर्शना देवाच्या मन अधीर 
सावता मळ्याची चुकवतो उधारी
कुठे हा लपला माझा श्रीहरी 

रामनाथस्वामी मंदिरी दर्शना 
पुढे केल्या देवापुढे कामना 
ज्ञानाची करे देव पारायण ज्ञानेश्वरी
कुठे हा लपला माझा श्रीहरी 

चारी धामात नाही मिळाला देव 
देव आहे मग्न संताच्या सेवेत 
पकडून शेष रजनी संत घरची पायरी 
कुठे हा लपला माझा श्रीहरी 

✍️ कवी शेषराव येळेकर (शेष)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract