STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Abstract Action Inspirational

4  

Sheshrao Yelekar

Abstract Action Inspirational

लावणी

लावणी

1 min
10

लावणी 


मी नार यौवन भरदार उघडा ना दार सुरक्षाकर्मी 
अहो राया,घालवू नका वाया, वेळ आहे कमी 

नक्षीदार लुगडी पायात चाळ, हळूच आली तुम्हापाशी 
तांबुल विडा लेवून अत्तर, वाटलं तुम्ही उपाशी 
धडधाकट बांधा, अहो नांगरून घ्या ही भूमी 
अहो राया घालवू नका वाया वेळ आहे कमी 

*करून शृंगार विसरून लाज शोधते ही बाशिंग* 
*सोळावं रक्त भूकेने पिसाळली ही वाघिण*

डोलदार बांधा,कमर लचेली, किती घायाळ मन 
तोडा तटबंदी दारात उभी नाही दुसऱ्याचं धन 
वाहत आली सरिता,कठोर नका होऊ तुम्ही 
अहो राया घालवू नका वाया वेळ आहे कमी 

*उघडून दार, घेऊन आत, ताऱ्यांची चमचमती रात* 
*जवळ घेऊन,नयन पिऊन, जन्मोजन्मी ची साथ*

✍️*शेषराव येळेकर*
दि १९/०५/२६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract