STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Drama Action Inspirational

4  

Sheshrao Yelekar

Drama Action Inspirational

गवळण

गवळण

1 min
7

दही घुसरून घुसरून माखन काढले 
यशोदे माखन कान्हाने चोरून खाल्ले 

गोप गळी घेऊन हा कान्हा चोरी करतो 
दही दूधाचे माठ हा रोज फोडतो 
वाट सोड सोड म्हणून हात जोडले 
 यशोदे माखन कान्हाने चोरून खाल्ले 

ना ना परी हा कान्हा खोड्या काढतो 
मथुरेच्या बाजाराची वाट आडवी धरतो 
गवळणीची याने वाट अडवून छेडले 
यशोदे माखन कान्हाने चोरून खाल्ले 

बासुरी मधूर वाजवून हा मन मोहतो 
प्रेम लडीवाळ लावून हृदयास छेडतो 
भक्ती प्रेमाचे लाडू याने सर्वांस वाढिले 
यशोदे माखन कान्हाने चोरून खाल्ले 


शेषराव येळेकर 
०२/०७/२०२६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama