STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Fantasy Inspirational Thriller

4  

Sheshrao Yelekar

Fantasy Inspirational Thriller

मार्ग विधाता

मार्ग विधाता

1 min
6


शोध नवी वाट नवी क्षितिजे 
बन स्वतःच मार्ग विधाता 
तुझे जीवन तुझे भविष्य 
ठरविते आंतरिक शक्ती नाता 

संकटांची येत राहतील 
जीवनभर तुफान लाट 
अंधारातही नेटाने शोधावी 
प्रकाशाची नवी वाट 

आयुष्याचे गणित 
नेहमी असे बेरीज वजा 
चढावा नंतर उतार 
नको घेऊ कर्मासी रजा 

आयुष्य काटेरी वळणदार 
भोग नेहमी कष्टप्रद 
उंच ध्येय ठेवून मनी घ्या 
जीवनात आनंदाचा स्वाद 

मनगटात ध्येय शक्ती 
तोवर अशक्य होईल शक्य 
तुझा तुच मार्ग विधाता 
हे ठरवितो तुझे कर्म भाग्य 

शेषराव येळेकर 
दि. १३/०७/२६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy