STORYMIRROR

Umakant Kale

Drama Others

4  

Umakant Kale

Drama Others

जीवन एक रंगभूमी

जीवन एक रंगभूमी

1 min
508

जीवन एक रंगभूमी


नको ठेवू शस्त्रे खाली

बाकी हा संर्घष किती ?

नाही संपले जीवन

आली गेली संकटे ती ?


एक रंगमंच हा रे

चाले रंगभूमी अशी..

कैक पात्र येथे तुला

लागे करावी रे अशी..


कधी दुखीताची सोंगे

कधी वेड्याची संगती ..

आले सुख तुला येथे

उदो वाजती गाजती...


ठेव लक्षात गड्या

नाही सोपे अभिनय..

दु:ख काळजात तुझ्या

वाट तू येथे रे हास्य...


आनी जानी ही रे छाया

तुझ्या का डोळ्यात पाणी ?

शिकवून घे तू आता

रंगमंच जिंदगानी ...


एक भाग तो संपला

मग पडदा पडेल..

वाजतील येथे टाळ्या 

तेव्हा तू असा हसेल...


रंगमंचावर तुला 

कसरत ती जमली..

खरा अर्थ जीवनाचा

तुझी बात ही बनली...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama