उंबरठा
उंबरठा
ओलांडुनी उंबरठा
लेक जाय सासुराला
काळजाचा तुकडा त्यो
दूर होय माहेराला।।
उंबरठा सासरचा
हाय अनोळखी जरी
आत ठेवता पाऊल
हसू खेळे ओठावरी।।
येता उंबऱ्याच्या आत
हरखले माझे मन
हयोच आता मानपान
हेचि आहे माझे धन।।
