एवढे तरी दे पांडुरंग !
एवढे तरी दे पांडुरंग !


भरभरून नकोच मजला
पुरेसे येऊ दे वाटेला
फक्त लागू देत मार्गा
एवढे तरी दे पांडुरंगा
नाही लालसा संपत्तीची
ना हव्यास लक्ष्मीचा
संसार लागावा मार्गा
एवढे तरी दे पाडुरंगा
दुष्कर्म कधी न घडावे
हातून ह्या आमुच्या
सत्कर्मच येऊ दे मार्गा
एवढे तरी दे पांडुरंगा
सेवा तुझीच व्हावी
मनी सदा हाच भाव
चिंतीतो तुलाच मार्गा
एवढे तरी दे पांडुरंगा
ऊणे नको पडू दे
आम्हा कधीच काही
चिंता न येवोत मार्गा
एवढे तरी दे पांडुरंगा
दुःख लोपूनी सुख यावे
कष्ट विफल न जावे
यशच मिळावे मार्गा
एवढे तरी दे पांडुरंगा
मागणे मागतो एकच
मन तुझ्यात रमावे सतत
नको वळवू वाम मार्गा
एवढे तरी दे पांडुरंगा