STORYMIRROR

Ashwini Jadhav

Drama Tragedy

4  

Ashwini Jadhav

Drama Tragedy

आयुष्य एक रंगमंच

आयुष्य एक रंगमंच

1 min
728

आयुष्य एक रंगमंच, 

आणि आपण त्यातले कलाकार. 

अभिनय येत नाही असं सगळेच म्हणतात, 

पण खरंतर येथे सगळेच अभिनय करतात. 


काहि लोक अभिनयात पारंगत असतात,

तोंडावर एक अन मागे बनतात, 

काम असेल तेव्हा गोड गोड बोलतात. 


तर काही पटाईत असतात लपवण्यात, 

जीवनातले दु:ख, मनाच्या वेदना लपवुन, 

कायम दुसऱ्याचा सुखासाठी झटत राहतात. 


रंगमंचावर प्रत्येक वळणावर, 

उत्कृष्ट अश्या भूमिकेचे

सादरीकरण करतात. 

प्रेक्षकांच्या मनात घर करणारे, 

आपणच एकमेव कलाकार. 


या मंचावर जगतांना, 

काही सुखद तर काही दुःखद क्षण. 

काही आंबट तर काही गोड क्षणाचे, 

आपण आहात साक्षीदार. 


जसे आपण लिहू तरीच, 

आपली कहाणी असणार आहे. 

आणि तो वर बसलेला विधाता, 

या रंगमंचावर दिग्दर्शक आहे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama