STORYMIRROR

Ashwini Jadhav

Inspirational

3  

Ashwini Jadhav

Inspirational

एकटी मी आणि चंद्र

एकटी मी आणि चंद्र

1 min
134

​एकटाच चंद्र आणि एकटीच मी उभी, 

चांदण्याही आज शांत होत्या नभी


एकटीच होती तेव्हा उदासीन वाटायचे, 

समदु:खी तो मिळता आता का कंटाळायचे


छान जमते आमचे हल्ली पडतात गाठी, 

तोही धुरा असतो त्याच्या चांदनी साठी


असंख्य चांदण्यांनी वेढलेला चंद्र ग्रहणाने एकटाच ग्रासतो, 

 न जाणे कसले प्रायश्चित म्हणून तुकड तुकडयामधन वावरातो


जरी असले दूर तरी तुचंरे माझ्या सोबती, 

चुपचाप जातो ढगाआड अचानक जून खेळुनी लपाछपी

 

ऐकवतो तो ही त्यांची आपबिती, 

ती अमावस्येची रात्र कठीण जाते किती


तु आणि तुझ्या आठवणींचा पसारा त्यात हरवून जातो, 

​एकटाच चंद्र आणि एकटीच मी अश्रुचे गीत गातो........ 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational