काय लिहू.....
काय लिहू.....
थोडं विचार करु मग एक गोष्ट लिहू....
भावना लिहू कि परिस्तिथी लिहू....
तुझ्या प्रेमाची साथ लिहू कि
माझ्या हातात तुझा हाथ लिहू...
तुझा मागे मी स्वतःला अनंत लिहू की
एकटेपणात स्वतःचा नाश लिहू....
अबोल शब्द लिहू कि बोलके वाक्य लिहू....
तुला चंद्र कि मला नक्षत्र तारा लिहू....
मायेचा हळुवार स्पर्श लिहू कि आनंद अश्रु लिहू...
शिंपले लिहू कि त्यातील रंगीत मोती लिहू.....
तुला बघु मग एक गोष्ट लिहू
प्रशंसा लिहू कि तक्रार लिहू.....
स्वप्नांतील तुला सकाळ कि स्वतःला सांज लिहू...
संग आज कोणती गोष्ट लिहू.....

