कळत नाही मला
कळत नाही मला
1 min
52
कळत नाही मला
असा कसा आहे मी
गरजेचा असूनही अभ्यास
त्यात रमत नाही मी
कळत नाही मला
असा कसा आहे मी
समाजात वावरण्यासही
होकार देत नाही मी
कळत नाही मला
असा कसा आहे मी
लाख बोलणे ऐकूनही
जागचा उभा आहे मी
खरच कळत नाही मला
असा कसा आहे मी
ज्याला हवे द्यायला दुय्यम स्थान
त्या साहित्याविना करमतही नाही
खरच कळत नाही मला
असा कसा आहे मी
दुःख असूनही ढिगभर
दोन थेंब अश्रूही गाळू शकत नाही
खरच कळत नाही मला.....!!!
