मनोगत
मनोगत
सरता सरले दिवस कधी माझें मलाच कळले नाही
वर्ष नवीन झाले सुरु तरी आश्र्चर्य आता वाटत नाही
हा, पूर्वी होती ही मज्जा , नवीन वर्षाची नवीन ती आशा
नवीन वर्षाच्या नवीन प्रवासाला होता आनन्दच सारा
पण आता ना उरला तो आनंद ना उरली ती आशा
वर्षे बावीस जगुनि या संसारात
साठवले मी ही भरपूर माज़्या मनात
नाही मला करायचे मोकलेही ते
उत्तरे लोकांच्या प्रन्श्नाचे देताना
आता नाही खोटे बोलायचे सारे
म्हणालो मी कितिही नाही
तरी हा समाज मला सोडणार नाही
अन मि सोडले तयास तरी हे
श्रुष्टिचक्र थांबणार नाही
हा हे सत्य अटल आहे
आयुष्याच्या प्रवासातील एक विचित्र अशी कळकळ आहे
जो करतो सदा प्रयत्न दाद मिळण्यासाठी
लोक बघे त्याजकडे आपलेपणासाठी
अन ज्यास वाटे सदा व्हावे भले इतरांचे
अशा माणुसकीला किमत हि कवडी मोलाचे
वर्षात या तसें पहिले मि खूप चढ उतार
बऱ्याचदा चढलो तर बऱ्याचदा घसरलोहि
पण यांनी शिकवले गोष्ट एक मला
पडलो तरी हरायचे नाही
हे सांगणारे नमन करतो मि त्या गुरूला
कलेची नाही कदर इथे
म्हणून मी या समाजसोबत समायोजन का करायचे ?
आणि या लोकांना कला कळतं नाही
म्हणून मि त्यांच्या म्हणन्याप्रमाणे का वागयचे ?
हो आत्ता तर खरच नाही आशा कोणती राहिली मला
कारण सुख दुःख सर्व सामान भासे माझ्या मनाला
हे वर्ष तर निघून गेले
पण पुढील वर्ष जावे सुखात
हि इच्छा नाही माझ्या मनात
कसेही जाओ वर्ष आताचे
इच्छा मागतो एकच मी तयाकडे
बळ, दे मला फक्त चढउतार सहन करण्याचे