मित्र नागदेव
मित्र नागदेव
काय झाले आज मला
शद्बच सुचेना मनाला
तुझ्यावर जीव करुनही अर्पण
सदा सर्वदा मात्र मनात
माझ्या आहे एकच दर्पण
आयुष्याच्या या प्रवासात
होता तुच एक जोडदार माझा
आहेस अजूनही आणि राहशील
नेहमी हे वचन फक्त दे मला
यात नसेल कोणती कमी
आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात
येशील का सोबत माझ्या एका हाकेला?
मी ही का शंका घेतोय तुझ्यावर
सर्व भुतलावर तुझीच सोबत आहे माझ्या जीवनावर
काही चुकले तर शिक्षा तु देतो मला
काही घडले चांगले तर गोड तोंड तू करतोस त्या क्षणाला
रुसलास कि तु माझ्यावर,
येत नाही झोप माझ्या मनाला
रुसवा तुझा काढताना
नाकिनव येतात माझ्या शरीराला
हवा तु आहेस मला ,असाच माझ्या सदैव
खरेच सांगतो भावा
आयुष्याच्या या प्रवासातला
तुच माझा मित्र नागदेव