खरं सांगू तुला
खरं सांगू तुला
खरं सांगू तुला
आवडत तर मलाही नाही
शिक्षा द्यायला तुला
पण काय करू मी
प्रेमाने समजावूनही जाणीव कशी नाही तुला
तयार तर मी आहे रे !
सोप्यात सोप्यामध्ये सांगायला
परंतु नसेल तुझीच आसक्ती जर त्यात
तर नाही पर्याय उचलल्याशिवाय हात
काम माझे आहे मार्गदर्शन करणे तुला
तुही त्याच मार्गावर चालव हिच अपेक्शा मला
तरीही लक्ष अभ्यासात का तुझे रमत नाही ?
शिकवताना बोलल्याशिवाय सवद का बरे मिळत नाही
माझ्यात असेल तोटा तर तसे सांग मला
एकदा नाही दहादा आहे मी पुन्हा सांगायाला
मान्य आहे मला आहे खूप तणाव तुला
म्हणून खेळीमेळीने शिकवण्याचा प्रयत्न असतो सदा
पण तुझी तर आहे एक वेगळीच अदा
असे शिकवूनही कमकुवत ठरतो मी
सर्वकाही दिसत असूनही
आत्मजाणीवे करता देतो पुन्हा संधी तुला
पण होते जेंव्हा सिमा पार मला
लागतो उचलाया हात वळनावर आणायला
पण नाही बुद्धी तुझी परिपक्व इतकी
समजू शकत त्या मागील विचार नेटकी
तरीही आशीर्वाद मी देतो तुला
पण खरं सांगू तुला.....!