STORYMIRROR

Ashwini Jadhav

Abstract Inspirational

3  

Ashwini Jadhav

Abstract Inspirational

आयुष्य म्हणजे काय असत...

आयुष्य म्हणजे काय असत...

1 min
647

आयुष्य म्हणजे काय असतं.... 

पान नवंकोरं नियतीच., 

शासन इच्छेविरुद्ध जगण्याचं, 

पुढे दूरवर दिसणारं मृगजळ असतं....  

आयुष्य म्हणजे काय असतं....

अथांग निळसर डावपेचांच, 

सदा अंथरलेल्या धूसर वाटेच, 

जबाबदारीच रणांगण असतं.... 

आयुष्य म्हणजे काय असतं.... 

जन्मा पासून मृत्यूपर्यंतच, 

सुख दु:खाच्या मिश्रणाच, 

आयुष्य ते आनंदाचेच जगणे असतं.... 

आयुष्य म्हणजे काय असतं.... 

थरार ते जगण्यासाठीचं, 

करार असतं भावनांचं, 

जन्म मरणाच्या प्रवासातलं सार असतं.... 

 आयुष्य म्हणजे काय असतं....

सोबत नांंदणं नात्यासोबतचं, 

पोळी रांजणे आपल्यांच, 

सुखाने गाठोडं बांधणं असतं.... 


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Abstract