काहीतरी हरवलं
काहीतरी हरवलं
1 min
409
रातराणीच्या गंधातून तिचे
हळवेसे माेहक क्षण
काजव्यांचे इवल् कण,
पान गळतीत हरवले पालविचे
ते काेवळे मन,
विचारांचे ओले सण....
काहीतरी हरवलंय.
भावनांच स्पर्श,शब्दाचा अर्थ.
डाेळयातील आसवे,गेली सारी व्यर्थ.
लाजाळूच लाजण,दवांच भिजणं
हरवलंय मनाच मनामध्ये रूजणं.....
जाणलंय आज पुन्हा
काहीतरी हरवलय,
या कल्पनेन कित्येक रत्र
मला विचारांमध्ये झुरवलय....
