STORYMIRROR

Ashwini Jadhav

Romance

3  

Ashwini Jadhav

Romance

भेट त्या जुन्या वाटेवरती

भेट त्या जुन्या वाटेवरती

1 min
12.2K

भेट त्या जुन्या वाटेवरती

विसरून सख्या रे तू बंध रेशमी

जाहला मुक्त हा विहंग गगनी 

मी बंदिस्त बेडीत वाटेवरती


घायाळ आजही अडखळलेली!!!

ना कसला रूसवा ना

भीती कशाची हाेती

ती तुझ्या माझे विश्व

रंगवत सजवत हाेती!!!


येशील परतून माघारी तू

आस मनी ही धरती आहे

भेटशील या वाटेवरती मज

विश्वास मनात जपला आहे!!!


मनात साठवलेल्या शब्दांना

ओठावर आणायचं आहे

एकदा मिठीत घेऊन तुझ्या

अश्रुंमध्ये चिंब भिजायचं आहे!!!


भेट आपली त्या वाटेवरती

अशी अचानक झाली हाेती

मी तुझ्याच सवे पाऊलवाट

खुडवत चालत हाेती!!!


परतले मग मागे त्या वाटेवरूनी

तिथे नव्हते काम काहीच माझे

बदलूनी गेला काळ सारा

पण वाट... तशी ती जुनीच हाेती!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance