STORYMIRROR

Trupti Naware

Romance

3  

Trupti Naware

Romance

एक जुना ऋतू येतो

एक जुना ऋतू येतो

1 min
14.9K


एक जुना ऋतू येतो

आठवणीच्या पावसातही

असं कधी कधीच होतं

तु असुनही एकाकी ती

रिमझीम धारेत जेव्हा

पापणी हळुच ओली होते

गार गार वाटते तिला

तुझी अदृश्य सावलीही

दोन चेहरे हसत होते

वेड लागलेल्या आरशातही

तुझेच रुप आले आहे

भेटावया प्रतिबिंबातही

अबोला असा सहवासातला

ती धुंद आनंदातही

खूप काही बोलते आहे

खूप काही ऐकूनही...!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance