श्रावणाने यावे आता ..!!!!
श्रावणाने यावे आता ..!!!!
1 min
135
आषाढाचे गाणे झाले उदासवाने
ऐकावयास आता कुणी तयार नाही
दारात वणवणतो वारा सुकली हिरवी पाने
पाण्यानेही आता ही आग विझणार नाही
प्रत्येक पहाट हृदयात उमलते नेहमीप्रमाणे
नवी निराशा होते आशेचे नवल राहिले नाही
ओसरलेल्या संध्याकाळी क्षितिजाचे निघून जाणे
अंधाराची वेदना चांदण्यांना कळत नाही
साठलेल्या पाण्याचेही दाटलेले शेवाळ होणे
कशास वेगळे करावे काही सुचत नाही
श्रावणाने यावे आता न करता काही बहाणे
वाट बघण्याची मेघांना सवय राहिली नाही ..!!!!!!!