दिवास्वप्न
दिवास्वप्न
1 min
316
दुपारच्या नीरव शांततेत
चिमण्यांची शाळा भरली
कुजबूज होती की हितगुज
खूप दिवसांनी चिवचिव ऐकली
रखरखत्या उन्हाची दुपार
पण सावलीत सुरक्षा होती
चिवचीवाटात धन्यता जगण्याची
नि जनमाणसाची आलोचना होती
आडोशात खिडकीच्या येऊन
एक चिमणी न्याहाळत होती
ह्या जीवघेण्या तुरुंगाची
तिच्या नजरेत चेष्टा होती
ती मोकळ्या आकाशात होती
मी बंद घरात होती
तिच्या चिवचिव स्वरातली इर्षा
दिवास्वप्नात येत होती !!!!!!!!!