वर्तुळ
वर्तुळ
मिटलेल्या डोळ्यातलं
आनंदाच अर्धवर्तुळ पाहताना
एका मोठ्या कालावधीनंतर
तडा गेलेल ते अर्धवर्तुळ
पुर्ण होताना दिसलं ....
तेव्हा वाटलं वर्तुळाला
बाजू असायला हव्या होत्या
एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत
ओघळुन स्विकारण्याकरता...
शेवटी विसावला आनंद
वर्तुळातल्या कंसात !
आणि छेदत गेला
प्रत्येक बिंदूतुन तयार होणाऱ्या अर्धवर्तुळाला
मिटलेल्या पापण्या
उमलल्या पाकळीसारख्या
आसवांच्या ओलीत
लिपल्या गेल्या
वर्तुळाच्या तडा
पण गाठता आला नाही वर्तुळाचा मध्य
आणि पाया नसलेलं ते वर्तुळ
पुन्हा अपुर्ण वाटलं ...
कदाचित् चुकत होतं
वर्तुळाचं समीकरण
मग ठरलं ...डोळे मिटुन
कधीच वर्तुळाची रचना करायची नाही..
कारण अर्धवर्तुळाकडे आनंदानेच
पाहावं लागत !!!!!