STORYMIRROR

yuvaraj jagtap

Romance

3  

yuvaraj jagtap

Romance

साथ तू देताना

साथ तू देताना

1 min
14.4K


साथ तू देताना

मी तुझ्यात गुंग

होऊनी बेभान

जसा वारा वाहे

रानात तुफान...


साथ तू देताना

फुलला आपला

संसाराचा गाडा

विश्वासास कधी

नाही गेला तडा...


साथ तू देताना

वाळल्या गवता

फुटले तगारे

रुक्ष जीवनास

स्वप्नांचे धुमारे...


साथ तू देताना

आशेची फुटली

पालवी कोवळी

दुःखाचा डोंगर

घाली पायदळी...


साथ तू देताना

नाही बाळगली

कसलीच तमा

संसार आपला

सुखातच जमा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance