प्रेमाचा कॅनव्हास
प्रेमाचा कॅनव्हास
आडव्या उभ्या धाग्यांची ..
सुरेख गुंफण करून ..
एकमेकाच्या साथीने
बनविलेल्या कॅनव्हासवर...
उधळायचे आहेत सप्तरंग प्रितीचे...
त्यात काही असतीलही गडद छटा..
आपल्या एकत्रित प्रवासातल्या...
पण त्यातही उठून दिसेल ...
तुझ्या माझ्या प्रितीचे ..
आरस्पानी सौंदर्य...
शेवटी निर्व्याज प्रित..
हेच दिगंबर सत्य ..
पुर्ण करेल...
आपल्या अपुर्णत्वाची चौकट ...

