मनातला पाऊस
मनातला पाऊस
मनामनातला पाऊस
बरसतो मनभर
भावनाना भर येता
नयनी दाटतो पूर
मनामनातला पाऊस
कधी वादळी वाटतो
सैरभैर करूनी मनाला
माझ्या माहेराला नेतो
मनामनातला पाऊस
कधी घननिळा होतो
कृष्णमयी राधा होते
मनोहारी भास होतो
